India Tour of Zimbabwe: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात रोहित शर्मासह (Rohit Sharma) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. एकदिवसीय मालिकेतली पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियासाठी शिखर धवनचा (Shikhar Dhawan) जोडीदार निवडणं हे मोठं आव्हान असेल. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात अर्धा डझन खेळाडू सलामीवीराची भूमिका बजावू शकतात. याचदरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं (Mohammad Kaif) शिखर धवनसोबत कोणाला सलामीला पाठवावं? हे सांगितलं आहे. 


झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघात निवड झालेल्या मध्ये इशान किशन, शिखर धवन, केएल राहुल आणि शुभमन गिल यांचाही समावेश आहे. हे फक्त सलामीवीर म्हणून खेळतात. यासोबतच गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांना सलामीवीर म्हणून खेळताना पाहिले आहे. मग संजू सॅमसनही एकेकाळी सलामीचा फलंदाज असायचा. अशा स्थितीत झिम्बाब्वेविरुद्ध सलामीची जोडी कोणती असेल, हा संघ व्यवस्थापनासमोर पेचप्रश्न ठरू शकतो.


मोहम्मह कैफ काय म्हणाला?
हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. परंतु, तो गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. यामुळं झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो शिखर धवनसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. पण शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात शिखर धवन आणि शुभमन गिलच्या जोडीनं चांगली कामगिरी करून दाखवली. यामुळं झिम्बाब्वेविरुद्ध शिखर धवनसोबत शुभमन गिल मैदानात उतरू शकतो. तर, केएल राहुल तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजी करू शकतो. 


वेस्ट इंडीज दौऱ्यात शुभमन गिलची कामगिरी
वेस्ट इंडीज दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्या शुभमन गिलनं 102.50 च्या सरासरीनं 205 धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं मिळवला. झिम्बाब्वे दौऱ्यातही शुभमन गिल चांगली कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.


हे देखील वाचा-