टीम इंडियाने विंडीजवर मिळवलेला हा सलग सहावा विजय ठरला. टीम इंडियाचा कर्णधार विराटने 6 चौकारांसह 59 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने 42 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 64 धावा फटकावल्या. ही खेळी करताना पंतने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
42 चेंडूत 65 धावांची खेळी करताना पंतने टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून एका डावात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. याआधी भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून धोनीने एका डावात 56 धावांची खेळी केली होती. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात धोनीने ही खेळी केली होती.
दरम्यान, युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा टीम इंडियाचे भविष्य आहे, असे विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. रिषभ पंतमध्ये क्रिकेटचं चागलं कौशल्य आणि गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणताही दबाव न टाकता त्याला योग्य तो वेळ देण्याची गरज असल्याचे विराटनं म्हटलं आहे.
धोनी लष्करी सेवेत दाखल | व्हिडीओ पाहा