नवी मुंबई : पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांची गुंडगिरी समोर आली आहे. जगदीश गायकवाडांच्या तीन मुलांनी विश्वनाथ गायकवाड या तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या आहेत. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.
डोक्याला जबर मार लागल्याने त्या तरुणाला रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपी नगरसेवकपुत्र सिध्दांत, संदेश, स्वप्निल यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सिद्धार्थ गायकवाड या तरुणाला दोन दिवसांपूर्वी नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी जुजबी कारणावरुन मारले होते. यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र आम्ही नगरसेवकाची मुले असल्यामुळे आमच्या विरोधात कोण कशी काय तक्रार करु शकतो? अशा वल्गना करत जगदीश गायकवाड यांची मुले सिध्दार्थला शोधत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे त्याचा भाऊ विश्वनाथवर आरोपींनी राग काढला.
रोडपाली येथील एका बारसमोर नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांसह अन्य चार ते पाच जणांनी विश्वनाथवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी विश्वनाथ याच्या डोक्यावर त्यांनी बियारच्या बाटल्या आणि ग्लास फोडले. यामध्ये विश्वनाथ हा गंभीररित्या जखमी झाला.
नवी मुंबईत नगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी, तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
07 Aug 2019 08:13 PM (IST)
नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांची गुंडगिरी समोर आली आहे. जगदीश गायकवाडांच्या तीन मुलांनी विश्वनाथ गायकवाड या तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या आहेत. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -