फ्लोरिडा : विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पूर्वतयारीला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ तीन टी20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे. त्यापैकी पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याचं आयोजन आज अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथे करण्यात आलं आहे.
उदयोन्मुख खेळाडूंच्या क्षमतेची चाचणी म्हणून विंडीज दौऱ्यातल्या या टी20 आणि वन डे सामन्यांकडे पाहिलं जात आहे. कारण ऑस्ट्रेलियातल्या आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीवर निवड समिती सदस्यांची नजर राहिल.
टी- 20 संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी
टीम इंडियाचा आज पहिला पेपर, विंडीजविरुद्ध टी20 सामन्यासाठी विराटसेना सज्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2019 11:59 PM (IST)
विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पूर्वतयारीला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ तीन टी20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -