लंडन : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताचा 4-1ने पराभव झाला. मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतरही दिलासादायक बाब म्हणजे कसोटी क्रिकेटमधील भारताचं अव्वल स्थान कायम आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या स्थानवर आहे. तर इंग्लंडलाही मालिका विजयाचा काहीसा फायदा झाला आहे.
इंग्लंडचा संघ कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाचे कसोटी क्रमावारीत 125 अंक होते. मात्र मालिकेतील पराभवानंतर भारताच्या खात्यात 115 अंक राहिले आहेत.
दुसरीकडे इंग्लंड संघ भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी 97 अंकासह पाचव्या स्थानवर होता. मात्र भारतासारख्या बलाढ्या संघाविरुद्ध मालिका विजयानंतर इंग्लंडला 8 अंकांचा फायदा मिळाला आहे. इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला मागे टाकत 105 अंकासह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या एक अंक मागे आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांचे 106 अंक आहेत. न्यूझीलंडचा संघ 102 अंकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
शेवटच्या ओव्हल कसोटीत इंग्लंडने भारताचा धावांनी 118 धावांनी पराभव करून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय साजरा केला. दुसऱ्या डावात इंग्लंडने भारताला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारताचा दुसरा डाव 345 धावांत आटोपला.
संबंधित बातम्या :