मुंबई : रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0' सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेलं सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं होतं. मात्र सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
व्हीएफएक्सच्या खर्चामुळे सिनेमा आधीपासूनच चर्चेत होता. सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर रजनीकांतच्या 'रोबोट' सिनेमाची आठवण होते. '2.0'मध्ये 'रोबोट'सिनेमातील 'चिट्टी'चे अॅक्शन सीन पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
'2.0' सिनेमात अक्षय कुमार निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा सिनेमातील लूकही समोर आला आहे. रजनीकांत पुन्हा एकदा वैज्ञानिकाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे.
एस. शंकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलं असून भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने ‘2.0’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरद्वारे अक्षयने ही माहिती दिली होती की, 2.0 या सिनेमातील व्हीएफएक्सवर 75 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 544 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
व्हिडीओ