Asian Weightlifting Championships: भारताची जागतिक ज्युनियर चॅम्पियन हर्षदा गरुड (Harshada Garud) हिला आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. तिनं 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचललं. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतानं जिंकलेलं हे पहिलं पदक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून तिच्या कामगिरीचं कौतूक केलं जातंय.


शियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या 68 वजनी गटात हर्षदानं स्नॅचमध्ये 68 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर क्लीनं अँड जर्कमध्ये 84 किलोग्राम वजन उचललं. हर्षदानं एकूण 152 किलो वजन उचलत कांस्यपदकावर कब्जा केला.  व्हिएतनामच्या माय फुओंग खोंगनं एकूण 166 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. तिनं स्नॅचमध्ये 78 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 88 किलो वजन उचललं. तर, इंडोनेशियाच्या सिती नफिसातुल हरिरोहनं एकूण 162 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलं. तिनं स्नॅचमध्ये 71 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 91 किलो वजन उचललं.


ट्वीट-






 


हर्षदाच्या कामगिरीवर कौतूकाचा वर्षाव
हर्षदानं ग्रीसमध्ये झालेल्या 2022 आयडब्लूएफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली होती.  तसेच खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तिनं 153 वजन उचलण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी तिनं स्नॅच 70 आणि क्लीन अँड जर्क 83 किलोग्राम वजन उचललं होतं. ज्यामुळं तिच्या कामगिरीचं सर्वांनीच कौतूक केलं होतं.


वेटलिफ्टिंगमध्ये भारताची जबरदस्त कामगिरी
वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारत दिवसेंदिवस आपला पाया मजबूत करताना दिसत आहे. नुकतीच इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टरनं लक्ष वेधीत कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत भारतानं एकूण 61 पदकं जिंकली होती. ज्यात 22 सुवर्ण, 16 रोप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश होता. यातील 10 पदकं भारतानं वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली होती.


हे देखील वाचा-