भारतीय क्रिकेटर्सना एकदाच अंडर १९ मध्ये वर्ल्डकप खेळण्याची संधी
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2016 05:32 PM (IST)
मुंबई :टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच्या नियुक्तीवर बीसीसीआयच्या कार्यकारिणीनं शुक्रवारी मंजुरीची मोहोर उमटवली. हिमाचल प्रदेशमधल्या धरमशालात आयोजित बीसीसीआयच्या कार्यकारिणीत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. रणजी करंडकाचे सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्याच्या तांत्रिक समितीच्या शिफारशीलाही कार्यकारिणीनं मंजुरी दिली. आयपीएलच्या धर्तीवर सप्टेंबर महिन्यात परदेशात मिनी आयपीएल खेळवण्याचा ठरावही कार्यकारिणीनं मंजूर केला. 19 वर्षांखालील वयोगटात दाखल झालेला खेळाडू त्या वयोगटात दोनच मोसमांमध्ये खेळू शकेल. तसंच 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषकात खेळण्यासाठी तो एकदाच पात्र राहिल ही ज्युनियर समितीची शिफारसही बीसीसीआयच्या कार्यकारिणीनं स्वीकारली आहे.