नवी दिल्ली : एनएसजी अर्थात अणूइंधन पुरवठादार गटातील प्रवेशासाठी सुरु असलेले भारताचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले आहेत. 48 देशांचा गट असलेल्या या समूहाची शुक्रवारी बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत भारताच्या सदस्यात्वाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
अमेरिकेपाठोपाठ फ्रान्ससारख्या बलाढ्या देशानं भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा दिल्यानं भारताच्या आशा उंचावल्या होत्या. चीनचा विरोध लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही चीनने एनएसजीतील भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला.
'या ' देशांचा विरोध
चीनसोबतच स्वित्झर्लंड, ब्राझील, ऑस्ट्रिया, न्यूझिलंड, तुर्की आणि आयर्लंड या राष्ट्रांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध दर्शवला. अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्यावर भारताने स्वाक्षरी केली नसल्याने हा विरोध करण्यात आला.