Highest IMDb Rating Indian Series On OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) अनेक वेब सीरिज (Web Series) आहेत, पण प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती, 'पंचायत' आणि 'मिर्झापूर' वेब सीरिजची. दोन्ही वेब सीरिजचा जॉनर परस्परविरोधी... पण दोन्ही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरल्या. या दोन्ही वेब सीरिज इतक्या लोकप्रिय झाल्या की, त्यांचे आतापर्यंत प्रत्येकी तीन सीझन झाले. प्रत्येक सिझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मात्र, या दोन सीरिजव्यतिरिक्त आणखी एक वेब सीरिज अशी आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आणि तिचे चार सीझनही प्रदर्शित झाले. वॉचिंग आणि रेटिंग दोन्हीच्या बाबतीत ही वेब सीरिज 'पंचायत' आणि 'मिर्झापूर'समोर पुरून उरते. 


दरवर्षी किंवा दर महिन्याला सोडा... हल्ली दररोज म्हटलं तरी काहीना काही ओटीटीवर येत असतं. ज्याला प्रेक्षकांकडूनही प्रसिद्धी मिळते. कोणत्याही वेब सीरिजला सर्वाधिक रेटिंग, ट्रेडिंग आणि वॉचिंगच्या कॅटेगरीमध्ये जज केलं जातं. याचा उद्देश प्रेक्षकांना सध्या ओटीटीवर सर्वात चांगली सीरिज किंवा चित्रपट कोणता? हे कळावं हाच असतो. यावर्षीही परदेशी आणि भारतीय अशा अनेक सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झाल्या आहेत. ज्यामध्ये बहुप्रतिक्षित 'पंचायत' आणि 'मिर्झापूर' सारख्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली होती. मात्र, त्यांना पुरून उरणारी वेब सिरीजही यावर्षी रिलीज झाली.


यावर्षी, 'पंचायत' आणि 'मिर्झापूर' सारख्या अनेक बहुप्रतिक्षित वेब सीरिजचं तिसरं सीझन ओटीटीवर प्रदर्शित झालं, ज्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ही सीरिज रिलीज झाल्यापासून ओटीटीवर ट्रेंडमध्ये आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत, ज्याचा चौथा सीझन या वर्षी रिलीज झाला होता आणि पहिल्या सीझनपासून आतापर्यंत या सीरिजनं अनेक दिग्गजांच्या सीरिजला मागे टाकलं आहे. मग तो रेटिंगचा, ट्रेंडचा किंवा सर्वाधिक पाहण्याचा विषय असो. या सीरिजला प्रेक्षकांचं सर्वाधिक प्रेम मिळालं.


IMDb वर  9.1 रेटिंग मिळालेली 'ही' वेब सीरिज पाहिलीय? 


आम्ही 2019 मध्ये आलेल्या 'गुल्लक' या वेब सीरिजबद्दल बोलत आहोत, ज्या सीरिजच्या सर्व सीझन्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'गुल्लक' ही मिडल क्लास फॅमिली ड्रामा सीरिज आहे, जी सोनी लिव्हवर पाहता येणार आहे. 'गुल्लक'मध्ये तेच दाखवलं आहे, जे तुमच्या आमच्या घरात घडतं. प्रत्येकाला ते आपल्याशी जोडलेलं भासतं. या सीरिजचा पहिला सीझन YouTube वर रिलीज करण्यात आला होता. पण, वाढत्या लोकप्रियतेमुळे Sony Liv ला सर्वच्या सर्व स्ट्रिमिंगचे अधिकार विकत घेण्यास भाग पाडलं. 


जमील खान, वैभव राज गुप्ता, गीतांजली कुलकर्णी आणि हर्ष मेयर यांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच सुनीता राजवारनं या मालिकेत 'बिट्टू की मम्मी' ही व्यक्तिरेखा साकारली होती. 'बिट्टू की मम्मी'च्या भूमिकेनं सुनीता राजवारला नवी ओळख मिळाली आणि ती रातोरात स्टार बनली. या मालिकेशिवाय ती 'पंचायत' आणि इतर सीरिजमध्येही दिसली. 'बिट्टू की मम्मी'च्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. याशिवाय ती यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरही दिसली. तिच्या वेगळ्या लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.


तसेच, जर आपण IMDb रेटिंगबद्दल बोललो तर, गुल्लकच्या पहिल्या सीझनला 10 पैकी 9.1 रेटिंग मिळालं आहे, जे 'मिर्झापूर' (8.4) आणि 'पंचायत' (9) पेक्षा जास्त आहे. 'गुल्लक'चे आतापर्यंत चार सीझन आले आहेत, जे सोनी लिव्हवर पाहता येतील. हा एक कौटुंबिक कॉमेडी ड्रामा आहे, जो संपूर्ण कुटुंबासह पाहता येतो. प्रत्येक हंगामाचं IMDB रेटिंग 8 पेक्षा जास्त आहे. 'गुल्लक'ची साधी सरळ कथा आणि गंमतीशीर संवाद यामुळे ती प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. मध्यमवर्गीय कुटुंब प्रत्येक गोष्टीत आपला आनंद कसा शोधतो? हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2 BO Collection Day 4 Worldwide: अल्लू अर्जुनच्या स्टारडमचा जगभरात डंका, भल्याभल्या स्टार्सना फुटला घाम; 'पुष्पा 2' फक्त चार दिवसांत 800 कोटी पार