वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, युवराज सिंह, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवड समितीनं वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आपला तगडा संघ पाठवला आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिज खराब रँकिंगमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत क्वॉलिफाय करु शकली नव्हती.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये 18 जूनला होणार आहे. त्यानंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इथं टीम इंडिया 5 वनडे आणि 1 टी20 सामना खेळणार आहे.
वेस्टइंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय संघाचा प्रशिक्षक राहणार असल्याचं बीसीसीआयनं याआधीच स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, वेस्टइंडिज दौऱ्यासाठी सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यादरम्यान भारतीय निवड समितीनं 23 जूनपासून सुरु होणाऱ्या वेस्टइंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -