बांगलादेशची नेहमी धुलाई करणारे भारताचे 5 फलंदाज

सिक्सर किंग युवराज सिंहने बांगलादेशविरुद्ध 2003 ते 2011 या काळात 13 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये युवीने 38 ची सरासरी आणि 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 344 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली बांगलादेशविरुद्ध नेहमीच चांगला खेळला आहे. विराटने 2010 ते 2015 या काळात बांगलादेशविरुद्ध 10 सामने खेळले, ज्यामध्ये 70 च्या सरासरीने 558 धावा ठोकल्या. यामध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे. बांगलादेशची गोलंदाजी मजबूत मानली जात आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर चांगली फलंदाजी करण्याचं आव्हान असेल. टीम इंडियाच्या ताफ्यात असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी बांगलादेशची नेहमीच धुलाई केली आहे.
टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने बांगलादेशविरुद्ध 5 सामन्यात 216 धावा ठोकल्या आहेत. 43 पेक्षा जास्त सरासरीने केलेल्या या धावामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने बांगलादेशची नेहमीच धुलाई केली आहे. रोहितने बांगलादेशविरुद्ध 2008 ते 2015 या काळात खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 34 च्या सरासरीने 302 धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने बांगलादेशची नेहमीच धुलाई केली आहे. जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर अशी ओळख असणाऱ्या धोनीने बांगलादेशविरुद्ध 2004 ते 2015 या काळात 17 सामने खेळले आहेत. 52 च्या सरासरीने 465 धावा त्याच्या नावावर आहेत, यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -