IND vs BAN In U-19 Asia Cup Semi-Final : दुबईत खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारतीयांच्या आशा मावळल्या आहेत. बांगलादेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला. बांगलादेशी संघाने भारताचा पराभव केला. भारतीय संघाला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या अंडर-19 संघाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी हार पत्करली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 188 धावांत गारद झाला. यानंतर बंगाली फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज बेरंग दिसले.






बांगलादेशचा कर्णधार महफुजुर रहमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगाली गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांच्या ठराविक अंतराने विकेट्स घेत राहिले. सलामीची जोडी 10 धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतली. 13 धावा झाल्या तोपर्यंत कर्णधार उदय शुन्यावर बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विकेट कोसळल्या. 


भारतीय संघासाठी केवळ मुशीर खान (50) आणि मुरुगन अभिषेक (62) यांनाच मोठी खेळी करता आली. याशिवाय एकाही फलंदाजाला 19 धावांच्या पुढे जाता आले नाही. 6 खेळाडूंना दुहेरी अंकही स्पर्श करता आला नाही. अशाप्रकारे भारतीय संघ 42.4 षटकांत 188 धावांवरच मर्यादित राहिला. बांगलादेशकडून मारूफ मृदाने चार बळी घेतले.


बांगलादेशने अरफुल आणि अहरारच्या भागीदारीने विजय मिळवला


189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. 34 धावा झाल्या तोपर्यंत आघाडीचे तीनही फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. येथून अरिफुल इस्लामने 90 चेंडूत 94 धावा आणि अहरार अमीनने 101 चेंडूत 44 धावा करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. दोघांमध्ये 138 धावांची भागीदारी झाली. संघाच्या 172 धावांवर आरिफुल बाद झाला. यानंतर बांगलादेशी संघ गडबडला आणि परत दोन विकेट गमावल्या पण त्यांना सामना जिंकण्यापासून रोखता आला नाही. भारतीय संघाकडून नमन तिवारीने तीन आणि राज लिंबानीने दोन गडी बाद केले.


इतर महत्वाच्या बातम्या