IND vs ENG, Yashasvi Jaiswal Double Hundred:  अवघ्या 22 वर्षीय टीम इंडियाचा सलामीवर यशस्वी जैस्वालने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या द्विशतकाची नोंद केली.  सिक्स मारून शतक केलेल्या यशस्वीने चौकार द्विशतकाला गवसणी घातली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात चारशेच्या उंबरठ्यावर मजल मारता आली. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला. भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी करत द्विशतक झळकावत 209 धावा केल्या.






यशस्वी जैस्वालने इंग्लंडची हवा काढली 


भारतीय संघाच्या पहिल्या डावात स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच एक बाजू अभेद्यपणे लढवली. यशस्वी जैस्वालला इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून फार काळ साथ मिळाली नाही, तरीही त्याने सर्व फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वाच्या भागीदारी केल्या.






पहिल्या डावात यशस्वी फलंदाजी करताना कोणताही इंग्लिश गोलंदाज त्याच्याविरुद्ध प्रभावी दिसले नाहीत. इंग्लंडचा प्रत्येक गोलंदाज यशस्वीसमोर असहाय्य दिसत होता. आपल्या 209 धावांच्या खेळीत यशस्वीने 290 चेंडूंचा सामना केला. त्याने 19 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली. यशस्वी जैस्वालची विकेट पहिल्या डावात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने घेतली. त्याने जैस्वालला बेअरस्टोकरवी झेलबाद केले.


वयाच्या 41 व्या वर्षी अँडरसनने 22 व्या वर्षी उत्साह दाखवला


इंग्लंडच्या बाजूने सर्वात यशस्वी आणि किफायतशीर गोलंदाज 41 वर्षीय जेम्स अँडरसन ठरला. त्याने आपला सर्व अनुभव भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजीत पणाला लावला. याचा पुरेपूर फायदा अँडरसनलाही झाला. या डावात त्याने 25 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 4 पदके टाकताना केवळ 47 धावा दिल्या. भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने शुभमन गिल, आर अश्विन आणि यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.


इतर महत्वाच्या बातम्या