Nashik Crime News नाशिक : शहरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. संशयितांनी दोन राऊंड फायर केले आहेत. जय भवानी रोडवर (Jai Bhavani Road Nashik) ही घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फायर केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik News) जय भवानी रोड परिसरातील साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुल उज्जैनवाल सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून उज्जैनवाल कुटुंबीय मध्यरात्री झोपलेले असताना अचानक त्यांच्या इमारतीखाली येऊन एका टोळक्याने हातात कोयते घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 


संशयितांकडून दोन राउंड फायर


त्यानंतर संशयितांनी काचेच्या बाटल्या फोडण्यात. एवढेच नाही तर काही वेळाने संशयितांकडून राहुलला समोर आणा त्याचा मुडदाच पाडतो, अशी धमकीही देण्यात आली. तसेच पिस्तूलमधून दोन राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. 


सात जणांविरोधात गुन्हा दाखल


याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून रात्रीची गस्त होत नसल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


नाशिकला दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे जप्त


दरम्यान,  नाशिक-पुणे मार्गावरील (Nashik - Pune Highway) इच्छामणी लॉन्सजवळ एक संशयित गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदार जयंत शिंदे, सोमनाथ गुंड यांना माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली. त्यानंतर सपकाळे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी यांना सूचना दिली. सपकाळे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीतून आणखी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कट्टा व तीन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शुभम अशोक जाधव (23), सचिन धर्मा सोनवणे (23), गणेश जगदीश भालेराव (24, सर्व रा. समतानगर), अशी संशयितांची नावे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या