नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलैदरम्यान विश्वचषकाच्या महासंग्रामातील भारत-पाक सामन्याला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी केला आहे. भारत-पाक संघांचा आयसीसीबरोबर करार झाला आहे. त्यामुळे या दोन संघांत 16 जून रोजी होणारा सामना ठरलेल्या वेळेतच होणार आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी वन डे विश्वचषकादरम्यान सुरक्षेला पूर्ण प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती रिचर्डसन यांनी दिली. इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलैदरम्यान विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. त्यासाठी आयसीसीकडून इंग्लंडमधल्या सुरक्षा एजन्सीजच्या सहकार्यानं सुरक्षेच्या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष देण्यात येणार आहे.
ख्राइस्टचर्च येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. या गोळीबारात बांगलादेशचे क्रिकेटपटूं थोडक्यात बचावले. या घटनेमुळे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना तात्काळ रद्द करण्यात आला असून बांगलादेशचे खेळाडू मायदेशी परतले आहेत.
संबंधित बातम्या
भारताला पाकिस्तानसोबत खेळावंच लागेल : आयसीसी
पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढा, बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार
विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकर
पाकिस्तानला कोंडीत पकडणं भारताच्या अंगलट
टीम इंडियाच्या शिलेदारांची नवी जर्सी, जर्सीवर विश्वचषक विजयांची स्टार प्रतीकं
'हे' संघ वर्ल्डकपचे दावेदार : एबी डिव्हिलियर्स
विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याला धोका नाही, आयसीसीच्या सीईओंचे स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2019 08:46 AM (IST)
इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलैदरम्यान विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. त्यासाठी आयसीसीकडून इंग्लंडमधल्या सुरक्षा एजन्सीजच्या सहकार्यानं सुरक्षेच्या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष देण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -