भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने पाकिस्तानला लोळवलं
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2016 07:29 PM (IST)
ढाका : भारताच्या ज्युनियर हॉकी संघानं बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानला लोळवलं आहे. अंडर एटीन आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधात केलेल्या यशस्वी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशात राष्ट्राभिमानाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचवेळी भारताच्या ज्युनियर हॉकीपटूंनी पाकिस्तानला हरवून गाजवलेल्या पराक्रमानं देशवासियांचा आनंद द्विगुणित झाला आहे. अठरा वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानववर 3-1 अशी मात केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. अठरा वर्षांखालील वयोगटाच्या या आशिया चषक हॉकीचं आयोजन बांगलादेशातल्या ढाक्यात करण्यात आलं आहे.