शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2016 01:25 PM (IST)
इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन,अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं पित्त चांगलंच खवळलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत असल्याचं पाकिस्ताने म्हटलं आहे. तसंच आमच्या शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, अशी उलटबोंब आता पाकिस्तानने सुरु केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आपली भूमिका मांडली. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचं नवाज शरीफांनी म्हटलं आहे. संबंधित बातम्या