श्रीनगर/मुंबई: उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताच्या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.
यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं. सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई असते. सोप्या भाषेत शत्रूची ठिकाण पाहून, तिथे घुसून मारणं होय.
कशी झाली कारवाई?
कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला.
भारतीय जवान हेलिकॉप्टरने घुसले
बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला. जवानांनी आधी हेलिकॉप्टरने अतिरेक्यांच्या तळाकडे कूच केली. मग हेलिकॉप्टरमधून उतरून, जवानांनी चालत जाऊन अतिरेकी तळांना घेरलं आणि हल्लाबोल केला.
5 तळं उद्ध्वस्त करुन गुपचूप परतले
भारतीय जवानांनी LOC पार करुन सुमारे दोन किमी आत घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी भारतीय जवानांनी एक-दोन नव्हे तर 5 तळं उद्ध्वस्त केली. इतकंच नाही तर हा हल्ला करुन, जवान गुपचूप भारतात परतले.
हॉटस्प्रिंग, लिपा, केल, भिंबर या अतिरेकी तळांवर भारतीय जवानांनी हल्ला करुन, उरी हल्ल्याचा बदला घेतला.
संबंधित बातम्या
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना
काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा
अभिनंदन मोदीजी... उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
सर्जिकल स्ट्राईक: वेळ आणि ठिकाण आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं!