नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडवर पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.


या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना वीस षटकांत आठ बाद 144 असं रोखलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं 19 षटकांत चार बाद 137 धावांची मजल मारली होती.

इंग्लंडला सहा चेंडूंत विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. पण जसप्रीत बुमरानं अखेरच्या षटकात कमाल केली. त्यानं ज्यो रुट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ दोन धावा मोजून भारताला पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.