अॅडलेड : गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. परंतु तो कितव्या क्रमांकावर खेळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये रोहित शर्माला संधी मिळाली नव्हती. परंतु एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे रोहितला संधी देण्यात आली आहे.

सराव सामन्यात पृथ्वी शॉला दुखापत झाल्यामुळे के. एल. राहुल आणि मुरली विजय यांना सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतासोबत ऑस्ट्रेलियानेही अॅडलेड कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

भारतीय संघ
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह


ऑस्ट्रेलियन संघ
मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड