Ind vs Zim 2nd T20: टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला झिम्बाब्वेने 13 धावांनी (Ind vs Zim) पराभूत केले. या विजयासह झिम्बाब्वेने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय संघ 102 धावांवर सर्वबाद झाला.

टी 20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता. मुझरबनी आणि चटारानं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला 13 धावांनी पराभूत केलं. वॉशिंग्टनं सुंदरनं 27 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. झिम्बॉब्वे विरुद्ध शुभमन गिल आणि वॉशिंग्टनं सुंदर शिवाय इतर फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयश आलं.

आज भारत आणि झिम्बाब्वेचा यांच्यात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचा पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झाला असला तरी दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करेल, अशी आशा आहे. तसेच भारतीय संघात दुसऱ्या टी-20 साठी कोणताही बदल न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ आज कोणत्या रणनिती घेऊन मैदानात उतरणार आणि पराभवाचा वचपा काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सामना कसा राहिला?

झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. अभिषेक शर्माला खातंही उघडता आलं नाही, तो शून्यावर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाड देखील झटपट बाद झाला. ऋतुराज गायकवाडने 7 धावा केल्या. भारतीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या रियान परागलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. रियान परागने फक्त 2 धावा केल्या. रिंकु सिंह देखील शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही अपयश आले. शुभमन गिल 31 धावा करत बाद झाला, तर ध्रुव जुरेलने 6 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिंकदर राजाने 3 विकेट् घेतल्या. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ:

शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा

India vs Zimbabwe चे वेळापत्रक-

पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे- झिम्बाब्वेचा विजयदुसरी टी-20 - 7 जुलै, हरारेतिसरी टी-20 - 10 जुलै, हरारेचौथी टी-20 - 13 जुलै, हरारेपाचवी टी-20- 14 जुलै, हरारे

संबंधित बातम्या:

Team India Celebration: झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा

घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

1983, 2007, 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला BCCI कडून किती रुपये मिळाले?, पाहा A टू Z माहिती