कोलकाता: टीम इंडियाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराने श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत नवा विक्रम रचला आहे. ईडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत पुजारा हा पाचही दिवस फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

पाचही दिवस फलंदाजी करणारा पुजारा हा जगातील नववा तर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे.

सर्वात आधी हा विक्रम 57 वर्षांपूर्वी भारताच्याच एम एल जयसिम्हा यांनी कोलकात्यातच केला होता. त्यानंतर रवी शास्त्री यांनीही अशी कामगिरी केली होती.

दरम्यान चेतेश्वर पुजाराने कोलकाता कसोटीत पहिल्या दिवशी नाबाद 8, दुसऱ्या दिवशी नाबाद 39, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी नाबाद 2 आणि आज तो फलंदाजी करत आहे.

महत्त्वाचं म्हणजे पुजारासह तीनगी भारतीयांनी ईडन गार्डन्सवरच हा विक्रम केला आहे.

कसोटीत पाचही दिवस फलंदाजी करणारे फलंदाज

1) एम एल जयसिम्हा (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया- कोलकाता 23 जानेवारी 1960

2) जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया - नॉटिंघम 28 जुलै 1977

3) किम ह्यूज (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड- लॉर्ड्स 28 ऑगस्ट 1980

4) एलन लंब (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडीज- लॉर्ड्स 28 जून 1984

5) रवी शास्त्री (भारत) विरुद्ध इंग्लंड- कोलकाता 31 डिसेंबर 1984

6) एड्रियन ग्रिफीथ (वेस्ट इंडीज) विरुद्ध न्यूझीलंड - हॅमिल्टन 16 डिसेंबर 1999

7) अँड्रूयू फ्लिंटॉफ (इंग्लंड) विरुद्ध भारत - मोहाली 9 मार्च 2006

8) एल्विरो पीटरसन (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड - वेलिंग्टन 23 मार्च 2012

9) चेतेश्वर पुजारा (भारत) विरुद्ध श्रीलंका - कोलकाता 16 नोव्हेंबर 2017