पणजी : समस्त गोमंतकीयांसाठी अत्यंत महत्वाची आणि अभिमानस्पद अशी बातमी आहे. ती म्हणजे कोंकणी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार, साहित्यकार दामोदर मावझो (Damodar Mauzo) यांना 2021 या वर्षीचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. दामोदर मावझो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोकणातील दुसरे साहित्यिक आहेत. त्या आधी रविंद्र केळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 


दामोदर मावझो यांनी गेल्या चार दशकांमध्ये विपुल लेखन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी कादंबरी, कथा, नाट्य लेखन, स्तंभ लेखन केलं आहे. 1983 साली त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर दामोदर मावझो यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 


 




दामोदर मावझो यांची ग्रंथसंपदा


कादंबरी
1975 –सूड
1981 – कार्मेलीन
2009- सुनामी सायमन
2020-जीव दिवं काय च्या मारूं


कार्मेलीन ही कादंबरी हिंदी, मराठी, इंग्लिश,पंजाबी, सिंधी, तामिळ, उडिया, मैथिली या भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.


कथा 
1971– गांथन
1975 – जागरणां
1981 – रुमडफूल
2001 – भुरगीं म्हगेली तीं
2014- सपनमोगी
2020-तिश्टावणी


ज्ञानपीठ हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असून तो भारतातील अनुसूची यादीत असलेल्या सर्व भाषांमधील लेखनासाठी दिला जातो. पुरस्कार विजेत्याला 11 लाख रुपये दिले जातात. 


महत्त्वाच्या बातम्या :