Rishabh Pant Ajaz Patel Hindi पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून पुण्यात सुरु झाली आङे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद 259 धावा केल्या. भारताच्या पहिल्या दिवसअखेर 1 बाद 16 धावा झाल्या होत्या. आजच्या पहिल्या दिवसातील रिषभ पंतचा सोबत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एजाज पटेल याला हिंदी भाषा कळते हे त्याला माहिती नव्हतं असं रिषभ पंतनं म्हटलं. 


भारताचा अष्टपैलू खेळाडूं वॉशिंग्टन सुंदर यानं न्यूझीलंडला जोरदार धक्के दिले. वॉशिंग्टन सुंदरनं 7 विकेट घेत न्यूझीलंडचा पहिला डाव लवकर संपवण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. वॉशिंग्टन सुंदर डावाची 78 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीकरत होता. त्यावेळी एजाज पटेल फलंदाजी करत होता. त्याचवेळी रिषभ पंतनं सुंदरला सल्ला दिला. तो म्हणाला फुल लेंथ आणि ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल टाक. यानंतर सुंदरनं पंतच्या आदेशाप्रमाणं बॉल टाकला. एजाज पटेलनं या बॉलवर लाँग ऑनला खणखणीत चौकार मारला.  यानंतर पंतला देखील आपलं आकाही तरी चुकलंय हे लक्षात आलं आणि तो म्हणाला  की मला काय माहिती याला म्हणजेच एजाज पटेलला हिंदी समजतं.  


रिषभ पंतचा हा किस्सा घडल्यानंतर पुढच्या दोन बॉलनंतर वॉशिंग्टन सुंदरनं एजाज पटेलला 4 धावांवर बाद केलं. पुणे कसोटीचा पहिला दिवस वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर राहिला. त्यानं न्यूझीलंडच्या 7 विकेट घेतल्या. यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरनं कसोटीत 6 विकेट घेतल्या होत्या.


दरम्यान, भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कॅप्टन रोहित शर्मा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. पहिल्या दिवसअखेर भारताचे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल मैदानात फलंदाजी करत होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या शिलेदारांना पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडनं पहिली कसोटी 8 विकेटनं जिंकली होती. पहिल्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा भारत 243 धावांनी पिछाडीवर आहे.


भारताला दुसऱ्या कसोटीत विजय आवश्यक


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बंगळुरूमध्ये पार पडली होती. न्यूझीलंडनं भारताला पहिल्या कसोटीत पराभूत केलं होतं. त्यामुळं दुसऱ्या कसोटीत भारताला विजय आवश्यक आहे.






इतर बातम्या :