Champions Trophy 2025 Final: रविवारी म्हणजेच 8 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्युझीलंड एकमेकांना भिडणार आहेत. सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली असून पूर्ण ताकतीने हा संघ मैदानात उतरला आहे. दरम्यान, सामना चालू असताना अचानक पाऊस आला किंवा सामना बरोबरीत संपला तर नेमकं काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोबतच आयसीसीच्या एका नियमाप्रमाणे भारत आणि न्युझीलंड हे दोन्ही संघ विजयी घोषित केले जाऊ शकतात. ते कसं शक्य आहे? हे समजून घेऊ या... 

100 षटकं खेळवली जाणार

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईत खेळवला जाणार आहे. या सान्यात पाऊस आला तर विजयाची गणितं बदलू शकतात. या सामन्यात एकूण 100 षटकं टाकली जाणार आहेत. यादरम्यान, पाऊस आल्यास नियमाप्रमाणे एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पावसामुळे रविवारी सामना होऊ शकला नाही, तर रिझर्व्ह डेच्या दिवशी हा अंतिम सामना खेळवला जाईल.

रिझर्व्ह डेच्या दिवशीही सामना झाला नाही तर? 

 रविवारी पावसामुळे सामना न झाल्यास तो रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल. मात्र रिझर्व्ह डेच्या दिवशीही सामना होऊ शकला नाही तर नियमाप्रमाणे दोन्ही संघांना विजयी म्हणून घोषित केलं जाईल. म्हणजेच अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कोणाचाही पराभव होणार नाही. दोन्ही संघ विजयी ठरतील. असाच प्रसंग 2002 साली एकदा आला होता. श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना चालू होता. हा सामना एकूण दोन दिवस खेळवला गेला. मात्र या दोन्ही दिवश पावसाचा व्यत्यय आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. शेवटी भारत आणि श्रीलंकेच्या दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आलं. 

 

सामना बरोबरीत संपला तर काय होणार? 

 भारत आणि न्युझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत संपला तर नियमाप्रमाणे सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत संपला तर जोपर्यंत विजयी आणि पराभूत संघ ठरत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील. 2019 साली अशीच स्थिती झाली होती. न्युझीलंड आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना चालू होता. सामना बरोबरीत संपल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यातही सामना बरोबरीत संपला. त्यानंतर पुन्हा सुपरओव्हर खेळवण्यात आली होती. त्यावेळीही सामना बरोबरीत संपला होता. त्यानंतर बाऊंड्री आऊटच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं.  

दरम्यान, भारत आणि न्युझीलंड हो देन्ही संघ तब्बल 24 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या सामन्यात नेमकं कोण जिंकणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

रोजा न ठेवल्यामुळे मोहोम्मद शमीवर टीका, जावेद अख्तर यांच्याकडून भारताच्या ढाण्या वाघाची थेट पाठराखण; ट्रोलर्सनाही सुनावलं!

IND vs NZ Final : भारत-न्यूझीलंडचा उद्या रंगणार महामुकाबला; 'फ्री'मध्ये live सामना कुठे पाहायचा?; वेळ, ठिकाण अन् A टू Z माहिती