IND vs ENG 1st Test highlights भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या PayTM Test match मध्ये जो रुटनं संघासाठी नाणेफेक जिंकत प्रथन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती, हे सारेच जाणत होते. तर, फिरकी गोलंदाजांना याचा थेट पाचव्या दिवशी फायदा होईल असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं. खेळाची सुरुवात पाहुण्या संघानं बेतानंच केली. बर्न्स आणि सिब्लेनं एक स्थिऱ भागीदारी केली. 63वर संघाची धावसंख्या असतानाच इंग्लंडचा बर्न्स अश्विनच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना बाद झाला.
पुढं संघाची फलंदाजी अधिकाधीक मजबूत होताना दिसून आली. सिब्ले आणि जो रुट यांच्या संयमी आणि प्रसंगी आक्रमक खेळीमुळं इंग्लंडच्या संघानं पाहता पाहता धावसंख्येचा द्विशतकी आकडा ओलांडला. पुढं पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच, बुमराहला ही भागीदारी तो़डण्यात यश मिळालं. सिब्लेला शतकापासून अवघ्या 13 धावा दूर असतानाच बाद करत त्यानं संघाला मोठं यश मिळलून दिलं. पण, अद्यापही खेळपट्टीवर जो रुट हजर असल्यामुळं आता दुसऱ्या दिवशी हा पाहुणा संघं धावसंख्येत आणखी किती भर टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपहारासाठीच्या विश्रांतीनंतर रुटनं 4 आणि सिब्लेनं 26 धावांपासून पुन्हा एकदा खेळीला सुरुवात केली. याचदरम्यान संयमी खेळाचं प्रदर्शन करत सिब्लेनं क्रिकेट कारकिर्दीतील चौथं अर्धशतक पूर्ण केलं. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या संघानं 263 धावांचा डोंगर रचला. आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं तीन गडी गमावत ही धावसंख्या गाठली आहे.
पहिल्या सत्रात संघातील कोणताही गडी न गमावणाऱ्या इंग्लंडनं उपहारापूर्वीच पहिला गडी गमावला. बर्न्स हा 33 धावा करत तंबूत परतला. डॅनिअल लारेंसलाही खेळपट्टीवर बुमहारनं फार काळ टीकून दिलं नाही. पण, त्यानंतर मात्र इंग्लंडच्या फलंदाजीत एक दमदार भागिदारी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांपैकी आर. अश्विनला 1 आणि बुमराहला 2 गडी बाद करण्यात यश मिळालं.