IND Vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मालिकेचे आयोन बायो बबालमध्ये करण्यात आले आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)चेन्नईमध्ये खेळला जाणारा सामना पाहण्याकरता 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली असून त्यासाठी तिकिच विक्री आजपासून सुरू होणार आहे.


मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या सामान्याची तिकिटे ऑनलाईन विक्रीसाठी आजपासून उपलब्ध असणार आहे. तामिळनाडू क्रिकेट संघाने (टीएनसीए) स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे.


टीएनसीएने रविवारी सांगितले की, सामान्य नागरिकांसाठी तिकिट इनसाइडर डॉट इन आणि पेटीएम डॉट इन या संकेतस्थळांशिवाय पेटीएम अॅप आणि पेटीएम इनसाइडर अॅपच्या माध्यमातून सोमवारी सकाळी १० वाजता तिकिट विक्री सुरू झाली आहे. तिकिटाची किंमत 100 ते 200 रूपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.


दोन टेस्ट मॅचनंतर दोन्ही संघ अहमदाबादला रवाना होणार आहे. तिसरा आणि चौथी कसोटी अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमला होणार आहे. 24-28 फेब्रुवारी दरम्यान होणारा तिसरा कसोटी सामना डे-नाईट खेळवण्यात येणार आहे. तर 4-8 मार्च दरम्यान खेळण्यात येणाऱ्या शेवटच्या सामन्यासाठी लाल चेंडू वापरण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :