IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (IND vs ENG 3rd Test) यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत टीम इंडियाला सामन्यात वापसी करुन दिली आहे. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 169 धावा करत 2 विकेट्स गमावल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) शतक झळकावले. तर इंग्लंडकडून जो रुट  (Joe Root) आणि टॉम हर्टली यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केले आहे. 


मोहम्मद सिराजचा भेदक मारा 


दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सुरु झाला तेव्हा बेन डकेटने जोरदार फटकेबाजी केली होती. त्याने 151 चेंडूमध्ये 153 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीनंतर इंग्लंडने सामन्यात टीम इंडियाला मागे टाकले होते. मात्र, आज मोहम्मद सिराज आक्रमक मारा करत 4 विकेट्स पटकावल्या आणि यशस्वीने फटकेबाजी करत शतक झळकावले त्यामुळे टीम इंडियाचे सामन्यात पुनरागमन झाले.  दुसऱ्या दिवशी भक्कम सुरुवात सुरुवात घेऊन उतरलेल्या इंग्लंडचा डाव तिसऱ्या दिवशी पूर्णत: गडगडला. टीम इंडियाने इंग्लडला 319 धावांवरती गुंडाळले.  भारताकडून मोहम्मद सिरजने 4 तर रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. 






यशस्वीची शतकी खेळी, टीम इंडियाकडे भक्कम आघाडी


यशस्वीने केलेल्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली आहे. त्यामुळे टीम इंडियाने आता 322 धावांची घेतली आहे. आजचे यशस्वी शतक अतिशय वेगवान ठरले आहे. तो वेगाने तीन शतकं झळकवणारा सातवा फलंदाज ठरला. हा विक्रम भारताकडून संजय मांजरेकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होता तो यशस्वीने मोडीत काढला. 


डकेटच्या शतकाने वाढवलं होतं टीम इंडियाचे टेन्शन 


इंग्लंडकडून पहिल्या डावात सलामीवीर बेन डकेटने मैदानावर उतरताच फटकेबाजी सुरु केली होती. त्याने दुसऱ्या दिवसअखेर केवळ 133 चेंडूमध्ये 118 धावा काढल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढलं होतं. इंग्लंडने दुसऱ्या दिवसात भारताचा 207 धावांचा लीड मोडून काढला होता. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट पटकावत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Yashasvi Jaiswal : यशस्वीच्या शतकी नजाऱ्याने इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळाले! सेहवागचा विक्रम मोडित काढला