Bajrang Punia : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका विदेशी व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरुन त्याला व्हॉट्सॲपवर मेसेज आला. दरम्यान, बजरंग पुनियाने (Bajrang Punia) याबाबतची तक्रार सोनीपतच्या बहलगड पोलीस ठाण्यात केली आहे.
काँग्रेस सोडा नाहीतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही
खरंतर, शुक्रवारीच कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी त्यांना किसान काँग्रेसचे कार्याध्यक्षही बनवण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसांनी बजरंग पुनियाला (Bajrang Punia) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बजरंग यांना एका विदेशी व्यक्तीच्या क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहले की, "बजरंग, काँग्रेस सोडा नाहीतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे."
सोनीपतमधील बहलगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
त्यानंतर बजरंग पुनियाने सोनीपतच्या बहलगड पोलीस ठाण्यात या धमकीनंतर तक्रार दाखल केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलीस प्रवक्ते रवींद्र सिंह म्हणाले, बजरंग पुनिया यांनी सोनीपतमधील बहलगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याला बाहेरच्या नंबरवरून मेसेज आला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई सुरू आहे. अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. हा तपासाचा विषय आहे. त्याचा तपास सुरू आहे.
बजरंग पुनिया हा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी 2023 मध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याशिवाय बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी मोठे आंदोलन देखील केले होते. बजरंग पुनिया हा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आहे.
विनेश फोगाट लढत आहे, मी तिला पाठिंबा देतोय
बजरंग पुनिया यांना काँग्रेसने विधानसभेसाठी उमेदवारी दिलेले नाही, तर हरियाणा विधानसभेच्या जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट हिला उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी न मिळाल्याच्या प्रश्नावर बजरंग पुनिया म्हणाले की, फक्त निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण नाही. याआधीही दोघांपैकी एकजण निवडणूक लढवणार असल्याचे बोलले होते. विनेश फोगाट लढत आहे आणि मी तिला पाठिंबा देत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sambhajiraje Chhatrapati : मनोज जरागेंना तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु, त्यासाठीच भेटलो होतो : संभाजीराजे छत्रपती