India vs Australia : सिडनीत सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियासमोर 375 धावांचे लक्ष ठेवले आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 374 धावांचा डोंगर उभारला आहे. ही ऑस्ट्रेलियाची वनडे सामन्यातील भारताविराधातील सर्वोच्च धावसंख्या आहे.


ऑस्ट्रेलियाचा सदाबहार फलंदाज स्टीव स्मिथने केवळ 62 चेंडूत शतक झळकावले. त्याने एकूण 66 चेंडूत 105 धावांची खेळी केली. त्यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. स्टीव्ह स्मिथच्या कारकिर्दीतल हे 10 वे शतक आहे. त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने बोल्ड केले. कर्णधार अॅरोन फिंचनेही शतक झळकावत 114 धावा केल्या. डेविड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले.


वॉर्नर आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागिदारी केली. वॉर्नरने 76 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 69 धावा केल्या.