Jasprit Bumrah In WTC: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. चार कसोटी सामन्यानंतर भारत आता आस्ट्रेलिया विरुद्ध पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियानं भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटीत भारताचा 184 धावांनी पराभव झाला. यामुळं भारताच्या  डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणं कामगिरी केली. मात्र, खराब फलंदाजी आणि काही चुकांमुळं भारताला 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत मालिकेत चांगली कामगिरी केली. मात्र, त्याला इतर  गोलंदाजांची साथ मिळाली नाही. मेलबर्न कसोटीत त्यांन  9 विकेट घेतल्या. 


जसप्रीत बुमराहाला आणखी ओव्हर मिळाल्या असत्या तर


आकडेवारीनुसार पाहिलं असता जसप्रीत बुमराहनं डब्ल्यूटीसीत चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाजीसह फलंदाजी देखील बुमराहची चांगली राहिली आहे. बुमराहच्या गोलंदाजीपुढं इतर सर्व फलंदाज फिके पडतात. बुमराहनं डब्ल्यूटीसीच्या  34 सामन्यात 154 विकेट घेतल्या आहेत. त्यानं10 डावात 5 विकेट घेतल्या आहेत. 
  
 बुमराहची कामगिरी?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 34 सामन्यात बुमराहनं 154 विकेट घेतल्या यापैकी 10 डावात बुमराहनं 5 विकेट घेण्याचं कौशल्य आहे. जाणकारांच्या दाव्यानुसार मेलबर्न कसोटीत त्याला सहकाऱ्यांची आवश्यक ती मदत मिळली नाही. इतरांनी गोलंदाजीत साथ दिली असता चित्र वेगळं असतं. बुमराहनं सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 30 विकेट 12.83 च्या सरासरीनं घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त बुमराहनं 7 डावात  4 विकेट गोलंदाज म्हणून घेतल्या आहेत. जाणकारांच्या मते बुमराहाला इतरांचं सहकार्य मिळत नाही.  बुमराहाला इतरांनी साथ दिली असती तर मालिकेचं चित्र वेगळं असतं.  


जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वात पहिला  विजय


2024-25 च्या बॉर्डर गावस्कर  ट्रॉफीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार पैकी एका कसोटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयी संघाचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराहकडे होते. त्या कसोटीत भारतानं पहिला विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांमध्ये पिछाडीवर राहिल्याचं पाहायला मिळालं. एका कसोटी सामन्यात भारताचा पराभव पावसामुळं टळला असं बोललं गेलं. 


टीम इंडियाला पलटवार करावा लागेल


भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम लढतीत विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.  डब्ल्यूटीसीच्या अंतिम  फेरीत प्रवेश करायचा असल्यास भारताला सिडनी कसोटीत मोठा विजय मिळवावा लागेल. सिडनी कसोटीत भारत कोणत्या संघाला संधी देणार हे पाहावं लागेल. 


इतर बातम्या :


Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार?