Test Matches For Team India In 2025 नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटसाठी 2024 हे वर्ष संमिश्र राहिलं. भारतानं तब्बल 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं विश्वविजेतेपद मिळवलं.टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक बनला, त्यानं राहुल द्रविडची जागा घेतली. त्यानंतर भारतीय संघाची एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातील कामगिरी खराब होत आहे. श्रीलंकेत भारताला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. यानंतर भारतात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी देखील पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं 3-0 नं भारताला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्राफीत भारताला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आता या मालिकेतील एक कसोटी 2025 मध्ये होणार आहे. त्या कसोटीसह भारत 2025 मध्ये 10 कसोटी सामने खेळणार आहे.
गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्यानंतर झालेल्या मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतानं तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात मालिका गमावली. न्यूझीलंडनं भारताला 3-0 असं पराभूत केलं. आस्ट्रेलियानं भारतावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 2-1 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील पाचवा सामना जानेवारी 2025 मध्ये होणार आहे.
भारतीय संघ 2025 मध्ये नेमके किती कसोटी सामने खेळणार?
भारत 2025 मध्ये पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीला कसोटी सुरु होईल. जर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला तर तो एक कसोटी सामना खेळता येऊ शकतो. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. तिथं भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल.
इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडेल. दोन्ही संघांमधील ही मालिका भारतात होईल. यानंतर आणखी एक मालिका भारतात होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होईल. म्हणजेच भारत 2025 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पोहोचल्यास ती संख्या 11 होईल.
दरम्यान, भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच ठेवायची असल्यास सिडनी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. सिडनी कसोटीत विजय मिळवल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या शक्यता वाढू शकतात.
इतर बातम्या :