मेलबर्न:भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानतंर, भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघासमोर फारसा मजबूत दिसत नाही. मात्र पहिल्या सामन्यात महत्वाच्यावेळी धावा आणि विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर विजय मिळवला होता.

पहिल्या सामन्यात काही चुका झाल्या होत्या. मात्र त्या चुका सुधारत पुढील सामन्यासाठी मैदानात उतरणार असल्याचं कर्णधार विराट कोहली म्हणाला. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही.

मागील सामन्यात शिखर धवन शिवाय अन्य फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. विराट कोहलीने लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं होतं. मात्र हा प्रयोग अयशस्वी ठरला. या सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, श्रेयस अय्यर, उमेश यादव, मनीष पांडे.

ऑस्ट्रेलिया संघ: अॅरॉन फिंच (कर्णधार), अॅश्टन अगर, जेसन बेहेरनडोर्फ, अॅलेक्स कॅरी, नॅथन कल्टर नाइल, क्रिस लिन, बेन मॅक्डॉरमेट, ग्लेन मॅक्सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टानलेक, मार्कस स्टोइनसी, अँड्र्यू टाय, अॅडम जाम्पा.