IND Vs AUS भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील चौथ्या कसोटीमध्ये खऱ्या अर्थानं नव्या जोमाच्या खेळाडूंनी आपली छाप सोडली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत माघारी धाडणारा मोहम्मद सिराज क्रीडारसिक आणि दिग्गज खेळाडूंच्या प्रशंसेस पात्र ठरला.
सिराज या अतिशय खास प्रसंगी वडिलांच्या आठवणीनं भावूक झाला. तर, त्यानं या कामगिरीतं श्रेय आईलाही दिलं. (IND Vs AUS 4th Test) चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सिराजनं ही बाब स्पष्ट केली. 'वडिलांच्या निधनांतर मला आईनं कायमच चांगल्या खेळासाठी प्रेरित केलं', असं तो म्हणाला. शिवाय वडील हयात असते, तर त्यांना आज माझा अभिमान वाटला असता, असं म्हणत त्यांत्याच आशीर्वादांमुळं मी आज ही कामगिरी करु शकलो, अशा शब्दांत त्यानं आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आईनं दिला मानसिक आधार
पाच विकेट आपल्या नावे करणं ही बाब अतिशय भाग्याची असल्याचं मोहम्मद सिराजनं सांगितलं. 'सामन्यानंतर मी घरच्यांशी संवाद साधला, आईशी संवाद साधला. यापुढंही चांगली कामगिरी करण्यासाठी आईनं मला प्रेरित केलं. तिच्याशी संवाद साधल्यानंतर मला एक प्रकारचा मानसिक आधारच मिळाला', असं सिराज म्हणाला.
England Series Selection | इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी दोन मोठे खेळाडू संघात परतण्यास सज्ज
ऑस्ट्रेलया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात सध्या मोहम्मद सिराज अत्यंत उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यानं या मालिकेमध्ये आतापर्यंतच्या एकूण 6 खेळींमध्ये 13 गडी बाद करत हे विकेट आपल्या नावे केले आहेत. शिवाय या मालिकेत एका खेळीत 5 विकेट घेणाराही तो एकुलता एक भारतीय गोलंदाज ठरला आहे.
IND Vs AUS | 5 विकेट घेणारा सिराज वडिलांच्या आठवणीनं भावूक, आईच्या एका फोनकॉलनं दिली ताकद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2021 12:03 PM (IST)
दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत माघारी धाडणारा मोहम्मद सिराज क्रीडारसिक आणि दिग्गज खेळाडूंच्या प्रशंसेस पात्र ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -