सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियासमोर 622 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारुंनी सावध सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 10 षटकांत एकही विकेट न गमावता 24 धावा केल्या आहेत. सलामीवीर मार्कस हॅरीसने (19) आणि उस्मान ख्वाजा 5 धावांवर खेळत आहेत.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या दमदार शतकांमुळे टीम इंडियाने सिडनी कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 622 धावांवर घोषित केला. भारताने ऑस्ट्रेलियात उभारलेली ही दुसऱी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. भारताच्या चेतेश्वर पुजाराचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. त्याने 373 चेंडूंचा सामना करताना 193 धावांची बहारदार खेळी केली. त्यात 22 चौकारांचा समावेश होता.
पुजारापाठोपाठ रिषभ पंतनेही कसोटी कारकीर्दीतले दुसरे शतक झळकावले. त्याने 15 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 159 धावांचे योगदान दिले. पंतने रवींद्र जाडेजाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. जाडेजानेही 107 चेंडूत 81 धावा केल्या. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावांची मजल मारली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. नॅथनने 57.2 षटकांत 178 धावा देत भारताच्या 4 फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर जोश हेजलवूडने 35 षटकांत 105 धावा देत 2 विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कने 26 षटकात 123 धावा देत एक विकेट घेतली.
संबधित बातमी : 'हे' तीन विक्रम करणारा रिषभ पंत पहिला भारतीय खेळाडू
IND vs AUS 4th test : भारताचा धावांचा डोंगर, ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2019 01:41 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारताने चांगलीच पकड मिळवली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियासमोर 622 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारुंनी सावध सुरुवात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -