तपोवन एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने नेमून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दराने खाद्य पदार्थांची विक्री केले जाते. याबाबत ऑक्टोबर महिन्यात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत आंदोलन केलं होतं. तर अनेक तक्रारीही दाखल केल्या होत्या. मात्र यानंतर मनसेचा शहराध्यक्ष सचिन पाटीलने रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे एक ते दोन लाखांची लाच मागितली होती.
याबाबत तपोवनमधील पॅन्ट्रीकार सुपरवायझर अशोक चतुर राठोड यांनी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार सचिन पाटीलला अटक करण्यात आली तर उत्तम चव्हाण हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दोघांवर फोनवरुन खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस एस दहातोंडे यांनी सचिन पाटीलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.