मयांक अग्रवाल या नवोदित खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तो सलामीला उतरण्याची शक्यता आहे. मयांक मेलबर्न कसोटी सामान्यामधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. मयांकसोबत दुसरा सलामीवीर कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. त्यामुळे रोहित कदाचित सलामीला खेळू शकतो. ही रोहित शर्मासाठी लॉटरीच म्हणावी लागले. तसेच सलामीला खेळण्यासाठी हनुमा विहारी हादेखील चांगला पर्याय भारतीय संघाकडे आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून कसोटी मालिकेत बरोबरी केली आहे. भारताने पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिरावला. दोन्ही सामन्यांत भारताच्या सलामीवीरांनी सर्वांचीच निराशा केली. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात मुरली विजय आणि के. एल. राहुल या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह