नागपूर : भारिप बहुजन महासंघाते नेते प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी झाली नाही तरीही राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करण्यासाठी काँग्रेस अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची माहिती 'माझा'च्या सुत्रांनी दिली आहे. आंबेडकरांना पाठिंबा देऊन त्याबदल्यात राज्यातील मतांचा पाठिंबा मिळू शकतो अशी काँग्रेसला आशा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सामील करुन घेण्याची काँग्रेसची इच्छा आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आधीच एमआयएमशी युती केली आहे. एमआयएमची साथ सोडून काँग्रेससोबत जाण्यास प्रकाश आंबेडकर तयार नाहीत आणि एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस तयार नाही. अशा स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांना अकोला मतदारसंघात पाठिंबा द्यायचा आणि त्याबदल्यात राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करायची असा काँग्रेसचा प्लान आहे.
प्रकाश आंबेडकरांना आघाडीत सामील करुन घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत मात्र त्यांनी एमआयएमची साथ धरल्याने काँग्रेसची अडचण झाली आहे. आता आघाडी न करता काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचा 'हात'?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Dec 2018 01:27 PM (IST)
राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करण्यासाठी काँग्रेस अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची माहिती 'माझा'च्या सुत्रांनी दिली आहे. आंबेडकरांना पाठिंबा देऊन त्याबदल्यात राज्यातील मतांचा पाठिंबा मिळू शकतो अशी काँग्रेसला आशा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -