IND Vs AUS 2nd ODI Playing XI: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या आज होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरक्षा धुवून काढलं होतं. मागील सामन्यात 10 ओव्हरमध्ये 89 धावा देणाऱ्या युजवेंद्र चहल आणि 10 ओव्हरमध्ये 83 धावा देणाऱ्या नवदीप सैनीला आज संघाबाहेर ठेवलं जाण्याची शक्यता आहे.


आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केलेल्या युजवेंद्र चहलने आपल्या वनडे करिअरमधील सर्वात महागडा स्पेल टाकत 10 ओव्हरमध्ये 89 धावा दिल्या. आजच्या सामन्यात चहलच्या जागी कुलदीप यादवला स्थान मिळण्याची शक्यता आहे. कुलदीपनं मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने पहिल्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 83 धावा दिल्या. सैनीच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागू शकते. सोबतच आयपीएलमध्ये आपल्या यॉर्करमुळं चर्चेत आलेल्या टी नटराजनला डेब्यूची संधी मिळू शकते. टीम इंडियाच्या फलंदाजांच्या फळीत मात्र कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही.


दुसरीकडे पहिल्या सामन्यात विजयानंतर देखील ऑस्ट्रेलिया संघात बदल होऊ शकतो. गोलंदाजी करताना जखमी झालेल्या ऑलराउंडर मार्क स्टोयनिसच्या जागी कॅमरन ग्रीन आणि मोयसेस हेनरिक्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.


3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाची या मालिकेत 0-1 अशी पिछाडी झाली आहे. त्यामुळे आज टीम इंडियासाठी करो या मरोची स्थिती आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना आज सकाळी 9 वाजेपासून सिडनीत खेळण्यात येणार आहे.


सिडनीतल्या पहिल्याच वन डेत यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकात आठ बाद 308 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्यानं 90 आणि धवननं 74 धावांची खेळी करुन विजयासाठी संघर्ष केला. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. पण जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.


अशी असू शकते Playing XI


Team India: शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी / शार्दुल ठाकुर / टी नटराजन, युजवेंद्र चहल / कुलदीप यादव और जसप्रीत बुमराह.


Australia: आरोन फिंच (कप्तान), डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशाने, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन / हेनरिक्स, ग्लेन मॅक्सवेल, पैट कमिंस, मिचेल स्टार्क, एडम जैम्पा और जोश हेझलवूड.