IND vs AFG 3rd T20 : टीम इंडिया इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज (17 जानेवारी) जेव्हा टीम इंडिया बंगळूरमध्ये अफगाणिस्तानशी भिडेल तेव्हा विश्वविक्रम करण्याची संधी असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. टीम इंडियाने दोन टी-20 सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरी टी-20 जिंकून रोहित ब्रिगेडचा अफगाणिस्तानला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाने तिसरा टी20 जिंकला तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम होईल.






'हा' विश्वविक्रम भारताच्या नावावर होऊ शकतो 


टीम इंडियाने तिसर्‍या T20 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला तर तो T20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप करणारा संघ बनेल. सध्या हा विश्वविक्रम भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे संयुक्तपणे आहे. मात्र, आज भारताने विजय मिळवला तर पाकिस्तानला मागे टाकून सर्वाधिक क्लीन स्वीप करण्याचा विश्वविक्रम नावावर होईल. भारतीय संघाने आतापर्यंत 8 वेळा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये क्लीन स्वीप केला आहे. पाकिस्तान संघाने 8 वेळा क्लीन स्वीपही केला आहे.


T20 मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप करणारे संघ



  • पाकिस्तान- 8

  • भारत- 8

  • इंग्लंड - 4

  • ऑस्ट्रेलिया- 3

  • न्यूझीलंड- 3

  • दक्षिण आफ्रिका - 3


टीम इंडिया वर्ल्डकपपूर्वी शेवटचा टी-20 सामना खेळणार 


2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा हा शेवटचा T-20 सामना आहे. यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध घरच्या भूमीवर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर आयपीएल 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. T-20 विश्वचषक आयपीएलनंतर लगेचच खेळवला जाईल, ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होतील.


'विराट' पराक्रम 6 धावा करताच होणार


दुसरीक़डे, किंग कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. त्याला अवघ्या सहा धावांची गरज आहे. या आकड्याला स्पर्श करणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरेल. कोहलीने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये (इंटरनॅशनल + डोमेस्टिक टी20 + फ्रँचायझी लीग) 11,994 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 14,562 धावा केल्या आहेत. शोएब मलिक दुसऱ्या आणि किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या