Sharad Pawar : येत्या 19 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे मंगळवेढ्या (Mangalvedha) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी हे दोन्ही नेते मंगळवेढ्यात येणार आहेत. 19 जानेवारीला दुपारी दीड वाजता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात शरद पवार शेतकऱ्यांना मार्गदर्श करणार आहेत. महाऑरगॅनिक अँड रेश्यूड्युफ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या नेत्त्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजीत केली आहे. सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट, गोपनबाई विहिरी समोर, मंगळवेढा येथे हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अॅड. भारत पवार आणि हरिभाऊ यादव यांनी दिली.
राज्यभर सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होत आहे. पण सेंद्रिय शेती उत्पादनांना शाश्वत मार्केट मिळत नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीबाबत खुष नाहीत. तसेच महाराष्ट्रातील जमिनीची सुपीकता संपत चाललेली असून जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमालीचा घटत आहे, जमिनीचे आरोग्य चिंताजनक अवस्थेत असल्याचे मत अंकुश पडवळे यांनी व्यक्त केले. नागरिकांनाही सेंद्रिय आणि विषमुक्त शेती उत्पादने मिळत नसल्यामुळं लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. यासाठी शेतकरी आणि ग्राहक यांचा समन्वय करून सेंद्रिय शेती उत्पादनांना चांगले मार्केट मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे अॅड पवार आणि यादव यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
सांगोल्यात कृषी प्रदर्शनाचे उद्धाटनही करणार
सांगोल्याचे माजी आमदार कै. डॉ गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यासाठी 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शरद पवार हे सांगोल्यात पोहचतील. तसेच या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे , विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकाप नेते आ जयंत पाटील यांची उपस्थिती असणार आहे .या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट , शिवसेना शिंदे गट आणि भाजप च्या अनेक आजीमाजी आमदारांनाही निमंत्रण करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापुरात येणार
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर येतायत. सोलापूर शहरात 19 जानेवारी रोजी त्यांचा रोड शो आणि रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगोला आणि मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Sharad Pawar : एकाच दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात, 19 जानेवारीला शरद पवारही दौऱ्यावर