पॅरिस : स्पेनची गार्बिनी मुगुरुझा फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन ठरली आहे. चौथ्या मानांकित मुगुरुझाने अंतिम फेरीत वर्ल्ड नंबर वन आणि गतवेळची विजेती सेरेना विल्यम्सचं आव्हान मोडून काढलं. मुगुरुझाने सेरेनाला 7-5, 6-4 असं हरवलं.


 

 

गेल्या वर्षी गार्बिनीला विम्बल्डनच्या उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. पण वर्षभरातच तिने पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं केलं आहे.

 

 

22 वर्षीय मुगुरुझा ही फ्रेन्च ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद मिळवणारी दुसरीच स्पॅनिश खेळाडू ठरली आहे. याआधी अरान्ता सँचेझ व्हिकारियोने तीनवेळा ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर गार्बिनीने हा पराक्रम गाजवला आहे.

 

 

दुसरीकडे सेरेना विल्यम्सला आपलं 22वं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवून स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.