Iga Swiatek : जगातील अव्वल क्रमांकाची पोलंडची महिला टेनिस खेळाडू ईगा स्वियाटेक हिने इटालियन खुल्या स्पर्धेत एतिहासिक कामगिरी केली आहे. 20 वर्षाय ईगा स्वियाटेक हिने इटालियन खुल्या 2022 स्पर्धा जिंकत इतिहास घडवलाय. इटालियन खुल्या 2022 स्पर्धेत अव्वल टेनिसपटू ईगा स्वियातेक हिने नवव्या क्रमांकाच्या सीड ट्यूनिशियाच्या ओन्स जेबूर हिचा पराभव केला. 6-2, 6-2 अशा सरळ दोन सेटमध्ये ईगाने ओन्सवर विजय नोंदवला. ईगा स्वियाटेक हिने लागोपाठ दुसऱ्यांदा इटालियन खुल्या महिला स्पर्धा आपल्या नावावर केली. 


इगा स्वियाटेकचा सलग 28 वा विजय 
इगा स्वियाटेकने महिलांच्या इटालियन खुल्या 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओन्स जेबुरचा 6-2, 6-2 असा पराभव केला. इगा स्वियाटेकचा हा सलग 28 वा विजय होय. इगा स्वियाटेकने हिने सरेना विलियम्सच्या लागोपाठ 27 विजयाचा विक्रम मोडीत काढला. सेरेनाने 2014 आणि 2015 मध्ये लागोपाठ 27 विजय मिळवले होते. उपांत्य फेरीत इगा स्वियाटेककडून पराभूत झालेली ओन्स जेबुर हिनेही लागोपाठ 11 सामने जिंकले होते. पण 12 व्या सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. 






ईगा स्वियाटेकचा प्रवास -
पोलंडच्या ईगा स्वियाटेक हिचा यंदाच्या हंगामातील हे सलग पाचवे विजेतेपद आहे. याशिवाय चौथे WTA 1000 विजेतेपद पटकावले.  फेब्रुवारीमध्ये ईगाने दोगामध्ये कतर खुल्या स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मार्चमध्ये इंडियन खुल्या स्पर्धेवर नाव कोरले होते. तर एप्रिलमध्ये मियामी खुल्या स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर जर्मनीमध्ये झालेल्या स्टटगार्ट ओऐपनवरही नाव कोरले होते. आता इटालियन खुल्या स्पर्धेवर नाव कोरत पहिल्या क्ले कोर्ट WTA 1000 चषकावर नाव कोरले. 22 मे रोजी सुरु होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेपूर्वी ईगाने प्रतिस्पर्धी खेळाडूंना एकप्रकारे आव्हान दिलेय.  










नोवाकचे दमदार पुनरागमन, इटालियन खुल्या स्पर्धेवर कोरले नाव
र्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचने इटालियन खुल्या 2022 स्पर्धा जिंकली आहे. सहा महिन्यानंतर जोकोविचने एखाद्या चषकावर नाव कोरलेय. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने स्टेफानोस सितसिपासला 6-0, 7-6 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. यासह जोकोविचने सहाव्यांदा इटालियन खुल्या 2022 स्पर्धेवर नाव कोरलेय. या विजयासह जोकोविचने फ्रेंच खुल्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना इशारा दिलाय. जोकोविचला कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीकरण न केल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या सह मोसमातील अनेक स्पर्धांमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर जोकोविचने टेनिस कोर्टावर दणक्यात कामगिरी केली आहे. स्टेफानोस सितसिपासचा पराभव करत नोवाकने कारकिर्दितील आपला 1001 वा विजय मिळवला. शनिवारी उपांत्य फेरीत सामना जिंकत जोकोविचने एक हजारावा विजय मिळवला होता. जिमी कॉनर्स (1,274 विजय), रॉजर फेडरर (1,251), इव्हान लेंडल (1,068) आणि राफेल नदाल (1,051) यांच्यानंतर एक हजारपेक्षा जास्त विजय मिळवणारा जोकोविच पाचवा पुरुष खेळाडू ठरलाय.