मुंबई: प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर विमेन्स कबड्डी चॅलेन्जचा नारळ फुटला. सलामीच्या सामन्यात ममता पुजारीच्या फायरबर्डसनं अभिलाषा म्हात्रेच्या आईस डिवाजचा 25-12असा धुव्वा उडवला.

 

मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात फायरबर्डस संघानं अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं.

 

फायरबर्डकडून ममता पुजारी आणि पायल चौधरीनं प्रत्येकी पाच गुणांची वसूली केली. तर आईस डिवाजसाठी खुशबू नरवाल आणि सोनाली शिंगाटेनं प्रत्येकी चार गुणांची कमाई केली. आयोजकांनी महिलांचे कबड्डी सामने सुरु केल्यानं महिला खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.