1. तुर्कीच्या इस्तंबुल विमानतळावर दहशतवादी हल्ला, तीन आत्मघातकी हल्ल्यात 36 जण ठार, तर 150 हून अधिक नागरिक जखमी


-------------------

2. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक, कर्मचाऱ्यांच्या वेतनात 18 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत

----------------

3. आंबेडकर भवन ताब्यात घेण्यासाठी राडा, रत्नाकर गायकवाडांचा आंबेडकर बंधूंवर आरोप तर आंबेडकर भवनाला विरोध न करण्याचं आठवलेंचं आवाहन

-----------------

4. सुधींद्र कुलकर्णींच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचा गोंधळ, पाकिस्तानी फोटोग्राफर्सना विरोध, तर आशिष शेलारांविरोधातही रस्त्यावर घोषणाबाजी

-----------------

5. मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन तरुणीचा वरळी पोलिसात धिंगाणा, अश्लील शिवीगाळ करत पोलिसांना दमदाटी, तरुणीला आवरताना पोलिसांची दमछाक

-----------------

6. अखेर एपीएमसीची मक्तेदारी मोडीत, फळं आणि भाज्यांच्या थेट विक्रीला मुभा, काँग्रेस-राष्ट्रवादीची गोची
-----------------
7. ठाण्यात चेकमेट सिक्युरिटीवर पहाटे धाडसी दरोडा, बंदुकीच्या धाकानं 8 कोटी रुपये लुटले, अद्याप दरोडेखोर मोकाटच

-------------------

8. मुंबईसह कोकणात सलग चौथ्या दिवशीही पावसाची संततधार, धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा, तर विदर्भावरही आभाळमाया कायम

-------------------

9. विठोबाच्या ओढीनं माऊलींचं पंढरीकडे प्रस्थान, आळंदीत इंद्रायणीतीरी वैष्णवांचा मेळा, तर तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी