मुंबई : यंदाच्या विश्वचषकात धोनीप्रमाणेच आर्मीप्रेमामुळे वेस्ट इंडिजचा एक खेळाडूही चर्चेत आहे. त्याचं नाव आहे शेल्डन कॉट्रेल. 29 वर्षांचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज विकेट घेतल्यानंतर आर्मी स्टाईलने सॅल्युट ठोकतो.


पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर कॉट्रेलने केलेले हे सेलिब्रेशन चर्चेचा विषय बनलं आहे. मुळात कॉट्रेल हा जमैकन आर्मीमध्ये आहे आणि जमैकन आर्मी फोर्सच्या सन्मानार्थ आपण सॅल्युट ठोकत असल्याचं कॉट्रेलने म्हटलं आहे.

'जेव्हा मला विकेट मिळतो, तेव्हा मी सलामी देतो. आर्मीच्या प्रशिक्षणादरम्यान मी परेड आणि सलामीची सहा महिने सराव केला होता, असं शेल्डन कॉट्रेलने सांगितलं.

शेल्डन कॉट्रेलने वेस्ट इंडिजसाठी 2015 मध्ये वन डे तर 2013-14 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. 2011 मध्ये सबीना पार्कमध्ये भारताविरुद्धच्या पाचव्या वन डे सामन्यात पिचची व्यवस्था करणाऱ्या सैन्याच्या कर्मचाऱ्यांपैकी एक होता.