लंडन : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. स्पर्धेत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय महिला संघानं जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवले आहेत.

भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांच्याकडे सामना खेचून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात 2005 ते 2017 या बारा वर्षांत केवळ नऊ एकदिवसीय सामने झाले आहेत. यात पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला आहे.

या स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीच्या तुलनेत पाकिस्तानी संघ दुबळा वाटत असला तरी, पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांचा अनुभव आणि त्यांची आतापर्यंतची
कामगिरी बघता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पाकिस्ताननं वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकला पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडनंही त्यांना नमवलं आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :1


क्रिकेटच्या मैदानात भारत-पाक पुन्हा भिडणार!


स्मृती मंधानाचं खणखणीत शतक, भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजवर विजय


'सांगलीची स्मृती भारतीय महिला संघाची सचिन'


उजव्या हाताने लिहिणे, डाव्या हाताने तडाखे... स्मृती मानधनाचा प्रवास!


बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते...!


मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे...