मुंबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं टी-20 क्रिकेटमधील आयसीसी क्रमवारीत फलंदाजांमधलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विननं गोलंदाजांमध्ये पुन्हा 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान मिळवलं आहे. तो सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर दाखल झाला आहे.
भारताच्या लोकेश राहुलनं फलंदाजांच्या क्रमवारीत 67व्या स्थानावरून 31व्या स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध फ्लोरिडातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत राहुलनं नाबाद शतक ठोकलं होतं.