दुबईः टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या वन डे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानी घसरण झाली आहे. तर शिखर धवन आठव्या स्थानी कायम आहे.


 

इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुटने पाकिस्तान विरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर पहिल्यांदाच टॉप 5 मध्ये झेप घेतली आहे. रुटने न्यूझीलंडचे फलंदाज केन विल्यम्सन, मार्टिन गप्टील आणि रोहित शर्मा यांना मागे टाकत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

 

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स 902 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान वन डे मालिकेतील कामगिरीचा पाकिस्तानच्या सर्फराज अहमद यालाही फायदा झाला असून त्याने 15 व्या स्थानी झेप घेतली आहे.